वरणगाव प्रतिनिधी । शहरात ८ ते १० दिवसाआड होणारा पाणीपुरवठा सुरळीत करावा आणि शहरातील रखडलेल्या विकास कामांना गती देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदनाद्वारे नगरपरिषदेला केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या निवेदना म्हटले आहे की, सध्या वरणगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून ८ ते १० दिवसाआड शहराला पाणीपुरवठा होत आहे. तापी नदीत मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असताना मानवनिर्मित पाणीटंचाई निर्माण केली जात आहे. शहरांमध्ये ३ ते ४ दिवसांनी होणारा पाणीपुरवठा हा नियोजन शून्य कारभारामुळे उशिरा होत आहे. तसेच तिर्थक्षेत्र नागेश्वर मंदीराचे रखडलेले काम, प्रभाग १८ मधील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सभागृह कामांची आर्डर काढूनही काम अपुर्ण पडलेले, रस्त्याच्या दोन्ही बाजूस झाले लावावी, प्रभाग क्रमांक १०मध्ये साई नगर ,हनुमान नगर,मच्छिंद्र नगर, लुंबिनी नगर,महालक्ष्मी नगर परिसरातीत झाडे काढणे, पावसाळ्यापुर्वी नाले गटारी साफसफाई करणे ही कामे प्राधान्याने घ्यावीत. यासह नागेश्वर मंदीराजवळ कोवीड सेंटर उभारण्यात यावे.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी नगरसेवक सुधाकर जावळे, युवक जिल्हा उपाध्यक्ष वाय.आर पाटील, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष पप्पू जकातदार, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष मनोज कोलते, भुसावळ तालुकाउपाध्यक्ष मनोज अग्रवाल, प्रकाश नारखेडे, वरणगाव शहराध्यक्ष समाधान चौधरी, उपशहराध्यक्ष कैलास माळी, माजी नगरसेवक विष्णु खोले, माजी नगरसेवक रवींद्र सोनवणे, माजी नगरसेवक साजिद कुरेशी, तालुका सरचिटणीस राजेश चौधरी, महेश सोनवणे, युवक कार्याध्यक्ष विनायक शिवरामे, डॉ. एहसान अहमद, युवक शहराध्यक्ष सोहेल कुरेशी, माजी युवक शहराध्यक्ष अनिल चौधरी, राजेश इंगळे, इफ्तेखार मिर्जा, शेख रिजवान, ओबीसी सेल वरणगाव शहराध्यक्ष हिमालय भाऊ भंगाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.