यावल येथे इंधन दरवाढ विरोधात राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन (व्हिडीओ)

यावल प्रतिनिधी । देशात कोरोना काळात महागाईचा फटका सर्वसामन्य जनतेला पोहचला आहे. इंधनदरवाढीच्या निषेधार्थ आज सोमवारी भुसावळ टी पॉईट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रस्त्यावर स्वयंपाक करून इंधनदरवाढचा निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आली. विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार आर.डी.पाटील यांना देण्यात आले आहे. 

मोदी सरकारने जनतेच्या विरोधात कार्य करत भरमसाठ दरवाढ केली आहे. जीवनाश्यक वस्तूंमध्ये घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे देशातील सर्वसामान्य माणसांचे आर्थिक बजेट बिघडले आहे. सामान्य नागरीकांनी जगावे का मरावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. असे म्हणत माजी आमदार मनिष जैन यांनी केंद्र सरकारवर निशाना साधला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन सप्ताहाला सुरुवात करण्यात आली आहे. आज महागाई आणि इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य हैराण झाला आहे. सर्वसामान्य माणसाच्या घरातील स्वयंपाक होणारे एलपीजी गॅस सिलिंडरचा दर अचानक २५ रुपयांनी वाढवला आहे. या देशातील सर्वसामान्य माणसाचे जगणे कठीण झाले असून, कोरोना सारख्या महामारीमुळे संपुर्ण हा आर्थीक व मानसिक संकटात ओढवला गेला आहे.  आपण जगावे कसे असे प्रश्न जनतेसमोर उभा राहीला आहे, असे यावलचे माजी नगराध्यक्ष तथा गटनेते अतुल पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करुन यावल शहरातील भुसावळ टी-पाँईटवर ५ जुलै सोमवार रोजी सकाळी ११ वाजता हे आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी आमदार मनिष जैन, राष्ट्रवादीचे यावल तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अॅड. देवकांत पाटील, फैजपुर शहराध्यक्ष अन्वर खाटीक, सामाजीक व न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष एस.पी.बोदडे , गिरधर पाटील, आदीवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष एम.बी.तडवी, माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते, जी.पी.पाटील, शहराध्यक्ष करीम मन्यार, युवकचे फैजपुरचे शहराध्यक्ष विनोद कोल्हे, युवकचे यावल शहराध्यक्ष हितेश गजरे, कामराज घारू, सहदेव पाटील, दिपक पाटील, ललीत तेली, किशोर माळी, अॅड. रियाज पटेल, व्दारका पाटील, शामल भावसार, प्रशांत पाटील, चंद्रकांत पाचपोळे, विनोद कोल्हे, रोहन महाजन, राजेश करांडे, अशोक भालेराव, अमोल दुसाने आदीनी या आंदोलनात भाग घेतला . यावेळी यावलचे नायब तहसीलदार आर.डी.पाटील यांना पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

Protected Content