मंत्रिपद न मिळाल्याने राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके राजीनामा देणार

prakash solanke

बीड, वृत्तसंस्था | राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीच्या १४, शिवसेना आणि अपक्ष १२ तर काँग्रेसच्या १० जणांचा समावेश करण्यात आला आहे. मंत्रिमंडळात अनेक नेत्यांना डावलवण्यात आल्याने नाराजीचा सूर उमटू लागला आहे. जिल्ह्यातील माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके आपल्या नाराजीमुळे लवकरच आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे ते आपला राजीनामा सोपवणार आहेत.

 

प्रकाश सोळंके यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे कर्तृत्व जास्त आहे. त्यांचे नेतृत्व पक्षाला मोठे वाटले असेल”. मराठवाडय़ातून राष्ट्रवादी काँग्रेसने राजेश टोपे आणि धनंजय मुंडे यांनी मंत्रिपद दिले आहे.

यावेळी बोलताना प्रकाश सोळंके यांनी आपण पक्षावर नाराज नसून राजकीय संन्यास घेत असल्याचे सांगितले आहे. “मी कधीही पक्षाशी गद्दारी करणार नाही. मी अद्यापही पक्षासोबत असून पक्ष सांगेल ते काम करु. मी अजिबात नाराज नसून कंटाळा आल्याने राजकीय संन्यास घेत आहोत. माझ्या राजीनाम्याचा संबंध मंत्रिमंडळ विस्ताराशी जोडला जाऊ नये. राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता म्हणून मी काम करत राहणार,” असे प्रकाश सोळंके यांनी म्हटले आहे. “मला का डावलण्यात आलं यासंबंधी पक्षच सांगू शकतो. पण राजकारणाचा वीट आल्याने मी निर्णय घेत आहे,” असेही सोळंके यांनी म्हटले आहे.

Protected Content