पारोळा येथे बालाजी संस्थानतर्फे आज भक्ती गीतांचा कार्यक्रम

WhatsApp Image 2019 12 31 at 12.24.15 PM

पारोळा प्रतिनिधी | शहरात आज दि.३१ रोजी बालाजी संस्थानच्या वतीने नववर्षच्या स्वागतासाठी भक्ती संगीताचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ठीक १२ वाजता प्रभु बालाजी यांची महाआरती करण्यात येणार आहे.

नववर्षाच्या स्वागतासाठी बालाजी संस्थानतर्फे भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याकार्यक्रमास रात्री ८ वाजेस प्रारंभ होणार आहे. नववर्ष स्वागत निमित्तानेरात्री ठीक १२ वाजता प्रभु बालाजी महाराजाची महाआरती व प्रसाद वाटप करून नववर्षाचे स्वागत केले जाणार आहे. तरी या कार्यक्रमाचे जास्तीत जास्त भक्तांनी लाभ घ्यावा, व नववर्षाचे स्वागत प्रभु बालाजी महाराज यांच्या दर्शनाने करावे असे आवाहन पारोळा बालाजी संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

Protected Content