पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी लोकसभा निवडणूकीसाठी जागावाटपासाठी महायुतीच्या दिल्ली-मुंबईमध्ये बैठका सुरू आहे. २६ मार्च रोजी आज राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. रायगड लोकसभा मतदारसंघातून त्यांनी महायुती उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँगेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांचे नाव जाहीर करण्यात आले असून २८ मार्च रोजी मुंबईत एकत्रित सर्व जागा घोषित होतील असे यावेळी पत्रकार परिषदेत अजित पवारांनी सांगितले.
अजित पवारांना सोबत यावेळी क्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, धनंजय मुंडे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, संजय बनसोडे उपस्थित होते. शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत अजित पवार यांनी दिले. धनंजय मुंडे यांना निवडणूक प्रमूख बनवण्यात आले. अजित पवार म्हणाले की, शिवाजीराव आढळराव पाटील हे 20 वर्षांपूर्वी आमच्या पक्षातून शिवसेनेत गेले होते, आज ते पुन्हा स्वगृही येत आहेत. भाजपने गेल्या निवडणुकीत २३ तर शिवसेनेने १८ जागी विजय मिळवला होता. त्यामुळे या सर्वांचा विचार करुन जागा वाटप निश्चित केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कमी जागा मिळत आहे, असे दाखवून चुकीचा प्रचार केला जात असल्याचा दावा त्यांनी केला.