चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील अंधारी या गावी राष्ट्रवादी महिला काँग्रेस चाळीसगाव तालुक्याच्या महिला अध्यक्षा सोनल साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली व तालुका उपाध्यक्षा परिघा आव्हाड यांच्या नियोजनात महिलांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी सोनल साळुंखे म्हणाल्या, गेल्या पाच वर्षाच्या काळात भा.ज.पा. सरकार प्रत्येक स्तरावर अपयशी ठरल्याने सरकारचा निषेध नोंदवला.
यावेळी तेथील स्थानिक रस्त्यांचे प्रश्न, रेशन मिळण्याच्या संदर्भातील अडचणी, जेष्ठ नागरिकांच्या राजीव गांधी योजनेच्या संदर्भातील अडचणी गावातील महिलांनी मांडल्या. गावात दारूबंदी झाली पाहिजे अशी तीव्र भावना बोलून दाखविली. बचतगट त्यावर मिळणारे कर्ज, येणाऱ्या अडचणी यावर महिलांनी चर्चा केली, सरकारने फक्त आश्वासने देऊन सामान्य जनतेच्या कशी फसवणूक केली, निवडून दिले खासदार फिरूनही पुन्हा कधी आले नाही, त्यामुळे येत्या लोकसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या उमेदवारीबद्दल समाधान व्यक्त केले जात होते.
यावेळी नुकतीच उपसरपंच म्हणून निवड झालेल्या लिलाबाई पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी हात गाव अंधारी गटाच्या पंचायत समितीच्या सदस्य प्रीती चकोर, अंधारी येथील उपसंरपंच लिलाबाई पवार, माजी पं.स. सदस्य मंगला आव्हाड, चंद्रभागा पाटील, कमल पाटील, रेखा पाटील, सुनंदा पाटील, मंगला कारे, आशा जाधव, उषा घुगे, इंदू वाघ, अनिता नागरे, प्रभावती करवा, अजय आव्हाड, श्रीराम पाटील, हिंमत पाटील, दत्तू पातील, धनराज चव्हाण, अशोक आव्हाड, साहेबराव चव्हाण, दीपक नागरे, सुजित पाटील, सौरभ त्रिभुवन, संतोष नागरे, सुनील आव्हाड गावातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.