मुंबई (वृत्तसंस्था) राज्यावर राष्ट्रपती राजवटीची वेळ येऊ देणार नाही’, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. तसेच शिवसेनेने ठरवल्यास राज्याला पर्यायी सरकार देऊ शकतो, असेही मलिक यांनी म्हटल्यामुळे चर्चेला उधान आले आहे.
मुख्यमंत्रीपदावरून भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरू असल्याने राज्यातील सत्तास्थापनेवरून दोन्ही पक्षातील वाद वाढत चाललाय. यापार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवटीची चर्चा सुरू झाली. पण ‘शिवसेनेने ठरवले तर राष्ट्रवादी काँग्रेस राज्याला पर्यायी सरकार देऊ शकतो. तसेच आम्ही राज्यावर राष्ट्रपती राजवटीची वेळ येऊ देणार नाही’, शिवसेनेने अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यांनी निर्णय घ्यावा. त्यानंतर आम्ही काँग्रेससोबत बसून मार्ग काढू. शिवसेनेने निर्णय घेतल्यास आम्ही पर्यायी सरकार देऊ शकतो’, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.