राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा वरणगाव येथे बस न थांबल्यास आंदोलनाचा इशारा

 

 

भुसावळ, प्रतिनिधी  । महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्याने वरणगाव येथे  बस  न थांबता ह्या सरळ महामार्गाच्या  मार्गाने निघून जात असल्याने प्रवाशांना  नाहक त्रास सहन करावा लगत आहे. वरणगाव येथे बस थांबली नाही तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे आंदोलना करण्याचा इशारा आगर प्रमुखांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

वरणगाव बस स्थानकात बस येत नसल्याने  परिसरातील खेड्यातील लोकांना ये जा करणे त्रासदायक ठरू लागले आहे.  त्यामुळे पूर्वी ज्या बसेस वरणगाव मार्गे जात होत्या त्या सर्व याच मार्गे जाऊन महार्गावरील सर्व बसेस वरणगाव येथे थांबल्या पाहिजेत अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन  छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस तालुका भुसावळच्या वतीने अगरप्रमुख  प्रमोद चौधरीना भेटून तालुका अध्यक्ष  दिपक मराठे याच्या नेतृत्वात  निवेदन  देण्यात आले. दरम्यान, जिल्हा बस नियंत्रक  दिलीप बंजारा  जळगाव यांच्याशीपण  दुरध्वनीवर संपर्क साधून कैफीयात मांडली.  वरणगाव बस स्टॅन्डवर  बसेस न  थांबल्यास तीव्र स्वरूपाचे आदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.  दोघा अधिकाऱ्यांनी सदरचे बस लगेच देण्यात येतील व बसेस वरणगांव बस स्टॅंन्डवर थांबतील असे आश्वस्त केले.  याप्रसंगी  भुसावळ तालुकाध्यक्ष दिपक मराठे, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष पप्पू जकातदार, वरणगाव शहरउपाध्यक्ष कैलास माळी, युवक तालुका कार्याध्यक्ष विनायक शिरनामे, अहसान अहमद, इफ्तेखार मिर्झा, ओबीसी सेल वरणगाव शहराध्यक्ष हिमालय भंगाळे आदी उपस्थित होते.

 

Protected Content