मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पंचविसावा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन मुक्ताईनगर येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यालय मुक्ताईनगर येथे तालुका अध्यक्ष यु डी पाटिल सर यांच्या हस्ते पक्षाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी उपस्थित राहून पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पक्षाच्या वर्धापन दिना निमित्त शुभेच्छा दिल्या आणि मार्गदर्शन केले यावेळी त्या म्हणाल्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा समता व संविधानाच्या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहु महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा आणि सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा धर्मनिरपेक्ष विचारसरणीचा
कष्टकरी शेतकरी युवक महिलांच्या हिताचे निर्णय घेणारा पक्ष आहे. शरद पवार यांनी पंचविस वर्षांपुर्वी लावलेल्या या पक्षाच्या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे
मध्यंतरी अनेक लोकांनी या वटवृक्षाच्या मुळांवर घाला घालण्याचा प्रयत्न केला तरी हा वटवृक्ष खंबीरपणे उभा असुन तळागाळापर्यंत पोहचला आहे. शरद पवार यांचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, कला, क्रिडा, आर्थिक, कृषी, सहकार, उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, इत्यादि क्षेत्रातील उत्तुंग कार्य आहे. त्यांचे हे कार्य पक्षाचे ध्येय धोरण आपल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना जनसामान्यांपर्यंत पोहोचवयाचे आहे त्यासाठी सर्वांनी परत सज्ज व्हायचे आहे.

रोहिणी खडसे पुढे म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीत आपण बघितले जवळचे लोक सोडून गेले पक्षावर कठिण प्रसंग आले टिका टिपण्णी झाली पक्षाचे नाव चिन्ह हिरावले गेले तरी नव्या उमेदीने शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची दमदार वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्रातील जनता सदैव शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली व लोकसभा निवडणुकीत राज्यात जनतेने पक्षाला भरभरून मतदान करत पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले. आपल्या लोकसभा मतदारसंघात अपयश आले तरी अपयशाने खचुन न जाता आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, शरदचंद्र पवार यांच्या सोबत उभे राहून शरद पवार साहेबांचा आवाज बुलंद करण्यासाठी तसेच पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी एकनिष्ठता जपून स्वाभिमान बाळगून पवार साहेबांच्या साथीने महाराष्ट्राच्या हिताचा लढा पुरोगामी विचारांनी लढण्यासाठी व विधानसभा आणि इतर स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाचा झेंडा डौलाने फडकवण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हायचे आहे असे रोहिणी खडसे यांनी उपस्थितांना आवाहन केले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, तालुका अध्यक्ष यु डी पाटीलसर, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, शहराध्यक्ष राजु माळी, युवक शहराध्यक्ष बबलू सापधरे रामभाऊ पाटिल, बाळा भाल शंकर, प्रदिप साळुंखे, लता ताई सावकारे,साहेबराव पाटिल, जितेंद्र पाटिल, भाऊराव पाटील, राहुल पाटिल, निलेश भा

Protected Content