कंडारी येथे राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचारार्थ रॅली

prafull devkar

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्याती कंडारी मनखाय येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचे सुपुत्र राष्ट्रवादीचे युवा नेते प्रफुल्ल देवकर गावात प्रचार केला. यावेळी प्रचारादरम्यान युवा नेते प्रफुल्ल देवकर यांनी गावातील नागरीकांशी संवाद साधुन गावातील समस्या जाणून घेतल्या. यावेळी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या पालकमंत्री पदाच्या काळात विविध विकास कामांची जी घौडदौड सुरू होती. तीच विकासाची गती आता अधिक प्रभावीपणे होण्यासाठी गुलाबराव देवकर यांना निवडून दिल्यास पुन्हा विकास कामांना तीच गती मिळणार आहे असे आश्वासन प्रफुल्ल देवकर यांनी दिले. यावेळी माजी जि.प. सदस्य रविंद्र पाटील, राष्ट्रवादी तालूकाध्यक्ष युवकचे नाटेश्वर पवार, अरविंद माणकरी, श्यामभाऊ पाटील, मनोज पाटिल उपस्थित होते.

Add Comment

Protected Content