Home Cities जळगाव Live पहा : जळगावात राष्ट्रवादीचे शक्ती प्रदर्शन

Live पहा : जळगावात राष्ट्रवादीचे शक्ती प्रदर्शन

0
33

जळगाव प्रतिनिधी । गुलाबराव देवकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना उमेदवारी दिली आहे. आज ते आपला उमेदवारी अर्ज भरत आहेत. या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची संधी साधली आहे. आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास शिवतीर्थ मैदानावरून राष्ट्रवादी काँग्रेसची रॅली निघाली आहे. यात पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील हे सहभागी झाले आहेत. याशिवाय, उमेदवार गुलाबराव देवकर यांच्यासह पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्रभैय्या पाटील, आमदार डॉ. सतीश पाटील, आमदार सुधीर तांबे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. राधेश्याम चौधरीमाजी खासदार ईश्‍वरलाल जैन, गफ्फार मलीक, माजी आमदार दिलीप वाघ, संतोष चौधरी, राजीव देशमुख, कार्याध्यक्ष विलास भाऊलाल पाटील, प्रदेश प्रवक्ते योगेश देसले, संजय गरूड, नामदेव चौधरी आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. सभेच्या प्रारंभी शिवतीर्थ मैदानावर सभा सुरू असून यात विविध नेत्यांनी सत्ताधार्‍यांवर हल्लाबोल केला आहे.

पहा लाईव्ह सोबतच्या लिंकवर

https://www.facebook.com/100007294608501/videos/2239662069620258


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound