Home Uncategorized राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांचा प्रीतम मुंडेंना पाठिंबा

राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांचा प्रीतम मुंडेंना पाठिंबा


बीड (वृत्तसंस्था) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी पक्षाविरोधात बंडाचे निशाण फडकात भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना पाठिंबा दिला आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून नाराज असलेल्या क्षीरसागर यांनी आज बीडमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यात त्यांनी प्रीतम मुंडेंना विजयी करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिलेत.

 

या बैठकीत प्रीतम मुंडे यांना निवडणुकीत जिंकवण्यासाठी काम करण्याचे आदेश क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. याबाबत क्षीरसागर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोण चालवतो? हेच कळत नाही. जे कानामागून आले ते तिखट झाले असल्याही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound