चोपड्यात राष्ट्रवादी काँग्रेस अन शिवसेनेत सरळ लढत

shivsena and congress

चोपडा प्रतिनिधी । येथील विधानसभा मतदार संघातून आज १० जणांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता आठ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी खरी लढत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातच होणार आहे.

अर्ज मागे घेणाऱ्यात डी.पी.साळुंखे, मगन बाविस्कर, साहेबराव सैंदाणे, मासुम तडवी, अरूणा बाविस्कर, शामकांत सोनवणे, नरेश सोनवणे, धोंडीराम भिल, मनीषा चव्हाण, जितेंद्र ठाकूर यांचा समावेश आहे. तर जगदीशचंद्र वळवी (राष्ट्रवादी), लताबाई सोनवणे (शिवसेना), डॉ.चंद्रकांत बारेला (अपक्ष), प्रभाकर सोनवणे (अपक्ष), याकूब तडवी (बहुजन समाज पार्टी), माधुरी पाटील (अपक्ष) ईश्वरलाल कोळी (अपक्ष) आणि दगडू तडवी (अपक्ष) हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत.

निवडणूक निरीक्षक नरेंद्रसिंग पटेल यांनी मतदार संघात सज्जतेचा आढावा घेतला आहे. या मतदारसंघात मतदान केंद्र क्र.८० हे पिंक बूथ म्हणून तर ८७ केंद्र क्रमांक हे आदर्श मतदान केंद्र आहे. एकूण ३१८ केंद्र असून यापैकी ५ अतिदुर्गम तर ३ क्रिटिकल मतदान केंद्र आहेत. विधानसभा मतदारसंघात ५२६ सैनिकी मतदार आहेत. त्यांना मतदानासाठी सॉफ्ट कॉफी पाठविण्यात येणार असून मतपत्रिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शुभांगी भारदे यांनी यावेळी सांगितले. निवडणूक चिन्हे वाटप करणेसाठी मयुरेश शिंदे या बालकाच्या हस्ते ईश्वर चिठ्ठीने प्रक्रिया राबविण्यात आली. उमेदवारांनी आदर्श आचारसंहिता भंग होणार नाही याची जबाबदारी घ्यावी, अशा सूचना ही यावेळी देण्यात आल्या.

 

Protected Content