पाचोरा, प्रतिनिधी | ‘एकच ध्यास, मतदारसंघाचा सर्वांगिण विकास’ हे लक्ष्य ठेऊन कार्यसम्राट आ.किशोर पाटील यांनी पाचोरा-भडगाव तालुक्यात प्रत्यक्षात जी कामे करून दाखवली आहेत. त्यामुळे प्रेरीत होऊन भडगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश गंजे यांनी आज (दि.२०) आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपुर्वी भडगावात राष्ट्रवादीला मोठा फटका बसला आहे. भडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच स्व.सुभाष गंजे यांचे ते पुतणे आहेत.
यावेळी योगेश गंजे यांच्या नेतृत्वात कैलास अशोक शिंदे, कैलास सुभाष गंजे, संजय पंढरीनाथ गंजे, मनोज वसंत गंजे, बापु जगन्नाथ शिंदे, राजेन्द्र जगन्नाथ शिंदे, गणेश पंढरीनाथ गंजे, दत्तु भिमराव माळी, रमेश पंढरीनाथ गंजे, प्रशांत बापु पाटील, निलेश सुरेश पाटील, नितिन रतन गंजे, राहुल शेनफडु गंजे, जगदीश प्रदिप गंजे, अक्षय अरूण शिंदे, घनश्याम ज्ञानेश्वर माळी, चेतन रंगनाथ पाटील, ललित राजेन्द्र महाजन, सुधाकर रघुनाथ भोई, मंगेश राजाराम भोई, जितेंद्र परशुराम भोई, संजय शंकर भोई, राहुल राजु पाटील, प्रकाश बंडु गंजे, कुणाल प्रकाश गंजे, शुभम पाटील, अनिल दत्तु महाजन, भागवत हरचंद भोई, रूपेश आनंदा वाडेकर, समाधान तुळशिराम वाडेकर, विशाल प्रविण पवार, समाधान बापु शिंदे, विशाल रविंद्र शिंदे, मयुर नितीन पाटील, आकाश संजय गंजे, तेजस भिमराव माळी, संदीप भास्कर मराठे, अशोक नथ्थु गंजे, सुरेश श्रावण गंजे, धीरज सुधीर पाटील, दिनेश साहेबराव पाटील, दिनेश साहेबराव पाटील, ललित राजेन्द्र महाजन, समाधान राजेन्द्र महाजन यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश घेतला आहे.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी, भडगाव नगरीचे नगराध्यक्ष अतुल पाटील, तालुकाप्रमुख विलास पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाप्रमुख इम्रान अली सैय्यद, जि.प सदस्य संजय पाटील, पं.स सदस्य रावण भिल, शिवसेना शहरप्रमुख मनोहर चौधरी, युवराज आबा, शशिकांत येवले, आनंद मारवाडी, विनोद पाटील, डॉ. प्रमोद पाटील, उपनगराध्यक्ष वसिम बेग मिर्झा, नागेश वाघ, प्रदिप महाजन, युनुस खान, विश्वनाथ भोई, जिभाऊ महाजन, युवासेनेचे जिल्हा सरचिटणीस लखिचंद पाटील, तालुका युवाधिकारी रविंद्र पाटील, शहर युवाधिकारी निलेश पाटील, बंटी सोनार, अजय चौधरी, प्रविण येवले, दिलीप राजपुत यांच्यासह पदाधिकारी आणि कार्येकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य प्रवेश सोहळा संपन्न झाला.