जिल्ह्यातील वैदु समाजाला जात प्रमाणपत्र वितरीत करण्याची राष्ट्रवादीची मागणी

WhatsApp Image 2019 08 07 at 6.53.36 PM

यावल, प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील वैदु समाजाला राज्याचे सामाजीक न्याय मंत्री ना.सुरेश खारे यांना दिलेल्या निवेदनाची त्यांनी तात्काळ दखल घेत राज्यातील पुणे, अहमदनगर, सोलापुर, कोल्हापुर, या जिल्ह्यांमध्ये शिबीर घेवुन ज्या पद्धतीने वैदु समाजाला जातीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आलीत त्याच पद्धतीने जळगाव जिल्ह्यातील वैदु समाज बांधवांना ही शिबीरे घेऊन जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागासवर्गीय शाखेच्या माध्यमातुन तहसीलदार जितेन्द्र कुवर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस मागासवर्गीय शाखेचे शहराध्यक्ष कामराज रुपचंद घारू यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्याप्रमाणे जळगाव जिल्ह्यात देखील वैदु समाज खुप मोठया प्रमाणावर आहे. अत्यंत कष्टकरी समाज असुन संपुर्ण महाराष्ट्रात विखुरलेला आहे. वैदु समाज हा अत्यंत कष्टमय जिवन जगणारा भटका समाज आहे. या समाजातील मुल मुलींना केवळ जातीचे प्रमाणपत्रा अभावी शिक्षणापासुन वंचीत राहावे लागत आहे. या समाजाकडे जातीच्या प्रमाणपत्रासाठी आवश्यक ती लागणारी बरेचशी कागदपत्र नसल्यामुळे या समाजाला जातीचे प्रमाणपत्र मिळवता येत नाही. वैदु समाजाला जात प्रमाणपत्रासाठी लागण लागणारी कागदपत्रांची अटशितील जळगाव जिल्ह्यात सर्व तालुका पातळीवर आणि गावपातळीवर शिबिरांचे आयोजन करून जात प्रमाणपत्र देण्यात यावीत अशी मागणी राष्ट्रवादी मागासवर्गीयचे यावल तालुका उपाध्यक्ष शिवराम कोकण वैदू हे या जात प्रमाणपत्रासाठी समाजाला विशेष सहकार्य करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश पोपटराव येवले यांच्या उपस्थित देण्यात आले. याप्रसंगी कामराज घारू, शिवराम कोकण वैदु, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अब्दुल करीम रज्जाक मन्यार, ओ.बी.सी. सेलचे तालुकाध्यक्ष निवृती धांडे, रा. कॉं. मागासवर्गीय सेल तालुका अध्यक्ष नाना बोदडे, अरूण लोखंडे, दिलीप भास्कर वैदू व जगन प्रल्हाद वैदू (रावेर), मोतीलाल सरकार वैदु, चिनाना सरकार वैदु, सुनिल कोकण वैदु, अण्णा फकीरा वैदु, सिताराम मारूती वैदु, कलाबाई चिंधु वैदु , सुमनबाई सरकार वैदु, परशुराम मच्छींदर वैदु यांच्यासह आदी वैदु समाज बांधव मोठया संख्यने उपस्थित होते

Protected Content