मुंबई प्रतिनिधी । सामूहिक बलात्कारानंतर मृत्यूमुखी पडलेल्या तरूणीला न्याय मिळवून देण्यासाठी आज राष्ट्रवादीतर्फे मोर्चा काढण्यात आला. यात या प्रकरणाची एसआयटीतर्फे चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
चेंबूर येथील गँगरेप प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात चुनाभट्टी पोलीस ठाण्यावर आज मोर्चा काढण्यात आला. या दरम्यान सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. त्या पुढे म्हणाल्या, की सामूहिक बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी असून आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करत आहोत. या घटनेला आज एक महिना उलटून गेल्यानंतरही आरोपींना अटक झालेली नाही. हे सरकार असंवेदनशील आहे. पीडितांना न्याय देणे जमत नसेल तर गृहमंत्रालयाने याची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा अशी मागणीदेखील सुळे यांनी केली.