
फैजपूर (प्रतिनिधी) आजच्या घडीला मानवी जीवनाचे अंतिम सत्य आनंद आणि सुख हेच असून भौतिक सुख मिळवण्यासाठी मनुष्याची धावपळ सुरु असते. आपण ध्यानधारणा आणि योग करून जीवनाला आनंदी करू शकतो. एनसीसी कडेट शिस्तप्रिय आणि कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत ध्येर्याने सामना करणारा असतो. त्यामुळेच एनसीसीतून देशावर प्रेम करणारा सच्चा नागरिक निर्माण होऊ शकतो. म्हणून राष्ट्रीय छात्र सेना देशाच्या भरभराटीसाठी अत्यंत उपयुक्त आहे, असे मत लहान वाघोदा येथील जगभरात पीस फौंडेशनचे काम करणाऱ्या मधुकर सोपान पाटील उर्फ डॉ.जहंस यांनी केले.
तापी परीसर विद्या मंडळ संचालित धनाजी नाना महाविद्यालयात १८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगावच्या वतीने दहा दिवशीय वार्षिक प्रशिक्षण शिबीर दिनांक ४ जून ते १३ जून २०१९ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात सकारात्मक विचारप्रणाली आणि एनसीसी या विषयावर डॉ राजहंस बोलत होते. यावेळी१८ महाराष्ट्र बटालियनचे समादेशक अधिकारी तसेच कॅम्प कामंडन्ट मा कर्नल सत्यशील बाबर, कॅप्टन नंदा बेंडाळे, लेफ्टनंट नूतन राठोड यांच्या सोबत जळगाव जिल्ह्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील जे डब्ल्यू आणि एस डब्ल्यू कडेट्स उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅम्प कमंडन्ट कर्नल सत्यशील बाबर यांनी केले. त्यांनी यशस्वी जीवनासाठी स्वयं शिस्त, वेळेचे नियोजन, मेहनत करण्याची तयारी आणि शारीरिक आणि मानसिक व्यायाम याला अनन्य महत्व असल्याचे प्रतिपादन केले.डॉ.राजहंस यांनी पॉवर पॉइण्ट सादरीकरण करून उपस्थित कडेट्सचे शंकाचे निरसन केले. सहभागी कडेट्स यांनी मनातील शंका विचारून ध्यान तंत्र समजून घेतले.
यानंतर शिबारात २२ डीलक्स रायफलची फायरिंग आणि थल सैनिक कॅम्पच्या निवडीसाठी ओबीस्टिकल प्रशिक्षण होणार आहे. यापुढे आपत्कालीन परिस्थिती त अग्निशमन दलाची भूमिका, ट्राफिक नियमांचे पालन, पोस्टाची कार्यपद्धती इ विषयांवर मार्गदर्शन पर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. या शिबिरासाठी नाहटा महाविद्यालयाचे एनसीसी अधिकारी प्रा.लेफ्टनंट दीपक पाटील, मुक्ताईनगर येथील प्रा. लेफ्टनंट व्ही.एम.लोंढे, बेंडाळे महाविद्यालयातील प्रा.लेफ्टनंट नंदा बेंडाळे, एम.जे. महाविद्यालय जळगाव येथील लेफ्टनंट नूतन राठोड, भुसावळ येथील फर्स्ट ऑफिसर नारायण वाघ, खिरोदा येथील चीफ ऑफिसर व्ही.एल.विचवे आदी अधिकारी कडेट्सना विविध विषयाचे प्रशिक्षण देणार आहेत. यासोबत पी आय स्टाफ प्रशिक्षित करणार आहेत.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी तापी परिसर मंडळाचे अध्यक्ष तथा रावेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरिषदादा चौधरी, उपाध्यक्ष प्रा डॉ एस के चौधरी, चेअरमन लिलाधर विश्वनाथ चौधरी, आणि सन्माननीय पदाधिकारी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ पी आर चौधरी, सर्व उपप्राचार्य सन्मा. प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, कैलास चौधरी, एम बी काळे बाबूजी, के एम सराफ, गौरव निमजे, एस एल लोखंडे, युवराज गाढे, नितीन सपकाळे, शेखर महाजन, चेतन इंगळे, प्रकाश भिरुड, नारायण जोगी, सुधाकर सपकाळे,देविदास महाजन एन सी सी कडेट्स आदींचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत आहे.