पैशांची बचत उज्ज्वल भविष्यासाठी अतिआवश्यक : प्रवीण पाटील

aac1a079 bad9 44cb 93ab e372999870ab

 

फैजपूर (प्रतिनिधी) आर्थिक नियोजन आनंदी आयुष्यासाठी गरजेचे असून बँकांमध्ये गुंतवलेले पैसा देशाच्या विकासाला हातभार लावतो. राष्ट्रीय छात्र सेना एकता आणि अनुशासन सोबतच आर्थिक नियोजनासाठी काम केल्यास जगात भारताचा गवगवा होईल, असे प्रतिपादन बँक ऑफ महाराष्ट्र , सावदा शाखेचे शाखा व्यवस्थापक प्रवीण पाटील यांनी केले.

 

तापी परीसर विद्या मंडळ संचालित धनाजी नाना महाविद्यालयात १८ महाराष्ट्र बटालियन एन सी सी जळगावच्या वतीने दहा दिवशीय वार्षिक प्रशिक्षण शिबीर दिनांक ४ जून ते १३ जून २०१९ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी आर्थिक साक्षरता आणि बचत याविषयी प्रवीण पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी देशाच्या विकासात बँकेचे महत्वाची भूमिका आणि प्रत्येक भारतीयांचे कर्तव्ये याविषयी अत्यंत ओघवत्या भाषेत संवाद साधला.

 

यावेळी१८ महाराष्ट्र बटालियन चे समादेशक अधिकारी तसेच कॅम्प कामंडन्ट मा कर्नल सत्यशील बाबर, प्रशासकीय अधिकारी मेजर सुशील कुमार, ए एन ओ साहेब, सुभेदार मेजर अनिल कुमार, बँक ऑफ महाराष्ट्र सावदा शाखेचे कशीयर आणि न्हवल विंग मधील एन सी सी अधिकारी म्हणून निवृत्त झालेले संजीव चौधरी, अनिल धनगर ,जे सी ओ, एन सी ओ, अधिकारी जळगाव जिल्ह्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील जे डी आणि एस डी कडेट्स चे ४०० कडेट्स उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कर्नल सत्यशील बाबर यांनी केले. त्यांनी देशाच्या रक्षणार्थ अहोरात्र डोळ्यात तेल ओतून उभ्या असलेल्या सैनिकांचे उदाहरण देऊन देश आणि समाजाप्रती प्रत्येक भारतीयांचे उत्तरदायित्व असल्याचे सांगितले. यानंतर शिबारात २२ डीलक्स रायफलची फायरिंग आणि थल सैनिक कॅम्पच्या निवडीसाठी ओबीस्टिकल प्रशिक्षण होणार आहे. यापुढे आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाची भूमिका, ट्राफिक नियमांचे पालन, पोस्टाची कार्यपद्धती इ विषयांवर मार्गदर्शन पर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.
या शिबिरासाठी नाहटा महाविद्यालयाचे एनसीसी अधिकारी प्रा.लेफ्टनंट दीपक पाटील, मुक्ताईनगर येथील प्रा.लेफ्टनंट व्ही एम लोंढे, बेंडाळे महाविद्यालयातील प्रा.लेफ्टनंट नंदा बेंडाळे, एम.जे. महाविद्यालय जळगाव येथील लेफ्टनंट नूतन राठोड, भुसावळ येथील फर्स्ट ऑफिसर नारायण वाघ, खिरोदा येथील चीफ ऑफिसर व्ही.एल.विचवे आदी अधिकारी कडेट्सना विविध विषयांचे प्रशिक्षण देणार आहेत. यासोबत पीआय स्टाफ प्रशिक्षित करणार आहेत.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी तापी परिसर मंडळाचे अध्यक्ष तथा रावेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरिषदादा चौधरी, उपाध्यक्ष प्रा डॉ एस के चौधरी, चेअरमन लिलाधर विश्वनाथ चौधरी, आणि सन्माननीय पदाधिकारी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ पी आर चौधरी, सर्व उपप्राचार्य सन्मा. प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, कैलास चौधरी, एम बी काळे बाबूजी, के एम सराफ, गौरव निमजे, एस एल लोखंडे, युवराज गाढे, नितीन सपकाळे, शेखर महाजन, चेतन इंगळे, प्रकाश भिरुड, नारायण जोगी, सुधाकर सपकाळे,देविदास महाजन एन सी सी कडेट्स आदींचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत आहे.

Add Comment

Protected Content