यावल( प्रतिनिधी)। येथील तहसील कार्यालयात कार्यरत असलेले कर्मचारी जितेंद्र पंजे पदोन्नतीवर यांची नायब तहसीलदार म्हणुन चोपडा येथे बदली झाली आहे.
जितेंद्र पंजे हे १९९४ साली सर्वप्रथम यावल तालुक्यातील विरावली येथे तलाठी म्हणुन सेवेत रुजु झाले होते. त्यांतर त्यांनी भुसावळ तालुक्यात १० वर्ष तलाठी म्हणुन सेवा बजावली. रावेर तालुक्यात त्यांनी ७ वर्ष विविध गावांना तलाठी म्हणुन कार्य केले. बामणोद तालुका यावल येथे मंडळाधिकारी म्हणुन बढतीवर येवुन ४ वर्ष सेवा केली. आता गेल्या तीन वर्षांपासून यावल तहसील कार्यालयात त्यांनी अव्वल कारकुन या पदावर कार्यरत होते. आपल्या कार्यतत्पर कर्मचारी म्हणुन जितेंद्र पंजे यांनी आपली ओळख निर्माण केली होती. त्यांची नुकतीच नायब तहसीलदार म्हणुन पदोन्नतीवर चोपडा येथे बदली झाली आहे.