धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना खान्देश प्रवासी असोसिएशन, धरणगाव यांच्या वतीने जळगाव ते सिल्वासा व जळगाव ते नवसारी या बससेवा धरणगाव मार्गे सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत जळगाव-धरणगाव-अमळनेर-धुळे-साक्री-नवसारी ही बससेवा सुरू करण्यात आली आहे.



ही बस दररोज सकाळी ११ वाजता धरणगाव बसस्थानकावरून प्रवासासाठी उपलब्ध असेल. खान्देश प्रवासी असोसिएशनच्या वतीने प्रवाशांनी या सेवेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या बसच्या पहिल्या फेरीप्रसंगी धरणगाव बसस्थानकावर बस चालक, वाहक तसेच व्यवस्थापक यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष संजय महाजन, गटनेते कैलास माळी, शिवसेना नेते व माजी नगरसेवक विजय महाजन, शहराध्यक्ष दिलीप महाजन, डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायत उपसरपंच चंदन पाटील, ज्येष्ठ आघाडी अध्यक्ष मधुकर महाजन, ज्येष्ठ रतिलाल चौधरी, युवा मोर्चा अध्यक्ष विशाल महाजन, माधवराव पाटील, बिपीन अमृतकर, पियुष बागड तसेच शिवसेना व भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खान्देश प्रवासी असोसिएशनचे अध्यक्ष कमलेश तिवारी, उपाध्यक्ष चंद्रकांत भावसार, सचिव श्रेयांस जैन, सहसचिव ॲड. नंदन पाटील, खजिनदार प्रतीक जैन, सदस्य नारायण महाजन, प्रशांत भाटिया, दिनेश पाटील, कन्हैया रायपुरकर, संभाजी सोनवणे, जतिन नगारीया आदी मान्यवरांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला.


