अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अमरावतीमध्ये मोठे राजकीय वादळ आले. प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी अमरावतीमधून भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्याविरूध्द उमेदवार जाहीर केला आहे. बच्चू कडू व शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव आडसूळ यांनी भाजपच्या नवनीत राणा यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला होता. परंतू तरीही भाजपने नवनीत राणा यांना अमरावतीतून उमेदवारी दिली. याला विरोध महायूतीत असतानाही बच्चू कडु यांनी शिवसेना उबाठाचे नेते माजी नगरसेवक दिनेश बूब यांना प्रहारतर्फे उमेदवारी दिली. त्यांनी नुकताचा प्रहार पक्षात प्रवेश केले होते. ठाकरे गटाने अमरावतीची जागा काँग्रेसला दिल्यामुळे दिनेश बूब नाराज होते. त्यामुळे त्यांनी शिवसेना उबाठाला रामराम करत प्रहार पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवली आहे.
अमरावती मतदारसंघात काँग्रेसने दर्यापूरचे आमदार बळवंत वानखेडे, वंचित बहूजन आघाडीकडून प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी दिली, आता त्यात दिनेश बूब यांची सुध्दा भर पडली आहे. त्यामुळे भाजपच्या नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सोपी जाणार नाही आहे.