Home Uncategorized अमरावतीतून नवनीत राणा निवडणूक लढवणार

अमरावतीतून नवनीत राणा निवडणूक लढवणार


अमरावती (वृत्तसंस्था) अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीकडून आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत युवा स्वाभिमानचे आमदार रवी राणा सहभागी झाले आहेत, रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला राष्ट्रवादीकडील अमरावतीची जागा सोडण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतला आहे. अमरावतीतील लोकसभा मतदारसंघातील जागेवर रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा निवडणूक लढवणार आहेत. युवा स्वाभिमान पक्षाच्या चिन्हावर अमरावती लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे रवी राणा यांनी सांगितले. नवनीत राणा कोणत्या पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र युवा स्वाभिमान पक्षाकडूनच ही निवडणूक लढणार असल्याचे रवी राणा यांनी स्पष्ट केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound