निर्वेद पाटील नॅशनल अॅस्ट्रोनाॅमी ऑलिंपिआड स्कूल लेव्हल परीक्षेत भारतातुन प्रथम

पहूर ता.जामनेर (वार्ताहर) नुकताच नॅशनल अॅस्ट्रोनाॅमी आॅलिंपिआड स्कूल लेव्हल या परीक्षेचा निकाल घोषित झाला. त्यात पहूर येथील निर्वेद रमेश पाटील हा विद्यार्थी पुन्हा एकदा देशातून प्रथम आला आहे. यापुर्वी तो ऑल इंडिया टॅलेंट सर्च आणि जनरल नॉलेज ऑलिंपियाड या परीक्षांमधे देशातून प्रथम आलेला आहे. यावेळी नॅशनल अॅस्ट्रोनॉमी ऑलिंपियाड स्कूल लेव्हलमध्ये देशातुन प्रथम येऊन  त्याने यशाची हॅट्रीक पुर्ण केलीय.

निर्वेद हा पहूर येथील डॉ. रमेश पाटील यांचा मुलगा आहे आणि जामनेर येथील प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेच्या जैन इंटरनॅशनल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता ८ व्या वर्गात शिक्षण घेत आहे. तीन वेळा वेगवेगळ्या ऑलिंपियाड परीक्षांमधे देशातून प्रथम येवून त्याने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. जैन इंटरनॅनल स्कूल मधे स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला. त्यावेळी ट्रॉफी देवून निर्वेदचा सत्कार करण्यात आला. संस्थाध्यक्ष राजू कावडीया, सचीव मनोज कावडीया, फिरोजा खान मॅडम, प्रा. ई. टी. पाटील सर, प्रा. सोनार सर, शिक्षक वृंद , पहूर पेठ सरपंच सौ.निताताई रामेश्वर पाटील, माजी जि.प.कृषी सभापती प्रदिपभाऊ लोढा,माजी जि.प.सदस्य राजधर पांढरे, धनगर समाज संघर्ष समिती उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील आदींनी निर्वेद पाटील यांच्या यशाबद्दल त्याचे अभिनंदन केले आहे.

Add Comment

Protected Content