जळगाव (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शाखा विलीनीकरण करण्याविषयी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे पदाधिकारी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भूमिका मांडतांना जळगाव शाखेची विद्यमान कार्यकारणी अनाधिकृत असल्याचे सांगत मुक्ताईनगर शाखेचे विलीनीकरण करून जळगाव जिल्हा शाखेवर मुक्ताईनगर शाखेची कार्यकारणी नियुक्त केल्याचे जाहीर केले आहे.
जळगाव शाखेच्या अगोदरच्या कार्यकारणीनीने सभासद वाढीसाठी, शाखेच्या विस्तारासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. शाखेचे ऑडीट करावे असे मध्यवर्ती शाखेतर्फे वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र तरीही ऑडीट न केल्याने तसेच अनेक अकार्यक्षमतेच्या मुद्द्यावरून मध्यवर्ती शाखेने जळगाव शाखेसाठी नवीन कार्यकारिणी नियुक्त केली असल्याची माहीती मध्यवर्ती नाट्य परिषदेचे कार्यवाहक सुनिल ढगे, सहकार्यवाहक सतीश लोटके यांनी दिली. यावेळी जळगाव शाखेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, जळगाव शाखेचे उपाध्यक्ष अॅड.संजय राणे, चंद्रशेखर पाटील, कार्यकारिणी सदस्य अनिल कोष्टी, योगेश शुक्ल आदी उपस्थित होते. कार्यकारणीच्या अकार्यक्षमतेमुळे पूर्णत: विस्तार थांबला होता, तो विस्तार वाढवा यासाठी नवी कार्यक्षम कार्यकारिणी नियुक्त करतांना शहरातील तसेच जिल्हाभरातील नाट्य चळवळीस चालना मिळेल अशी अपेक्षा नाट्य परिषदेचे सदस्य तसेच पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. रंगकर्मी रमेश भोळें आणि नितीन देशमुख यांच्या पत्रकार परिषदेवर नाराजी व्यक्त करतांना ते परिषदेवर सभासद देखील नसून त्यांनी घेतलेली पत्रकार परिषदेला काही अर्थ नाही असे स्पष्ट केले. रमेश भोळे यांच्याशी अनेकदा संपर्क साधला गेला, परंतु ते अर्वाच्य भाषेत बोलतात असा आरोप यावेळी करण्यात आला.
सुसंवादासाठी प्रयत्न : रोहिणी खडसे-खेवलकर
जिल्ह्यात नाट्य परिषदेचा विस्तार व्हावा यासाठी आम्ही सुसंवादासाठी प्रयत्नशील आहोत, रमेश भोळेंनी सामंजस्याची भूमिका घेऊन चर्चा करावी. त्यांनी मागदर्शन, सूचना करावी. त्यांच्या सूचनेचे पालन केले जाईल असे आवाहन जळगाव शाखेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांनी केले.परिषदेतर्फे राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचा आराखडा तयार असून लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल असे रोहिणी खडसे यांनी सांगितले.
नवनियुक्त कार्यकारणी :
अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, उपाध्यक्ष अॅड.संजय राणे, उपाध्यक्ष अॅड.संजय राणे, प्रमुख कार्यवाहक अॅड.पद्मनाभ देशपांडे, सहकार्यवाहक योगेश शुक्ल, खजिनदार डॉ.शमा सराफ, सदस्य अनिल कोष्टी, हेमंत पाटील, अॅड.प्रवीण पांडे, शरद पांडे, दीपिका चांदोरकर, प्रमुख मार्गदर्शक कवी ना.धो.महानोर, उद्योजक अशोक जैन, चारुदत्त गोखले यांचा समावेश आले.