पाचोऱ्यात केंद्र सरकारविरोधात ‘राष्ट्रव्यापी चरणबद्ध आंदोलन’

पाचोरा प्रतिनिधी । केंद्र सरकारने जाती आधारित जनगणना तसेच ओबीसीची जातनिहाय जनगणना न करण्याचे ठरविले आहे. त्याचे विरोधात, केंद्र सरकारने बनविलेल्या शेतकरी विरोधी तीन काळ्या कृषी कायद्यांच्या विरोधात, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या विरोधात, खाजगी क्षेत्रांमध्ये आरक्षण लागू करण्यासाठी तसेच जुनी सेवानिवृत्त वेतन योजना लागु करण्यासाठी आज दि. १२ रोजी पाचोरा येथे राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओ.बी.सी.) मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे तहसिल कार्यालयासमोर “राष्ट्रव्यापी चरणबध्द आंदोलन” करण्यात आले.

या आंदोलनास पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक भुषण वाघ, डॉ. भुषण मगर (पाटील) युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. भुषण मगर पाटील यांनी भेट देवुन पाठिंबा दिला आहे. आंदोलना प्रसंगी राष्ट्रीय ओ. बी. सी. मोर्चा जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे, राज्य उपाध्यक्ष विलास पाटील, राष्ट्रीय किसान मोर्चा तालुका प्रभारी नंदलाल आगारे, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुका अध्यक्ष हमीद शाह, बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजहर खान, नगरसेवक अशोक मोरे, रणजीत पाटील, समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे मच्छिंद्र (भावडु) जाधव यांचेसह राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओ. बी. सी.) मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चा सह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

 

Protected Content