बोदवड प्रतिनिधी । केंद्र सरकारने वाढदिवेल्या इंधन दरवाढीच्या विरोधात बोदवड येथील तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
केंद्र सरकारने वाढवलेल्या गॅस, पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीच्या विरोधात निषेध नोंदवला. ‘अबकी बार महेंगाई पे वार’ म्हणत आंदोलनात युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती किशोर गायकवाड, आबा पाटील, युवक तालुकाध्यक्ष विनोद कोळी, रामदास पाटील, प्रदीप बंडगुजर, विजय चौधरी, रविंद्र खेवलकर, प्रमोद धामोळे, वंदनाताई पाटील, प्रतिभा खोसे, कविता गायकवाड, अश्विनी पाटील, युवक शहराध्यक्ष अक्षय चौधरी, कडु माळी, वामनराव ताठे, मुकेश कराळे, जीवन राणे, प्रमोद शेळके, शिवाजी ढोले,श्याम पाटील, सचिन राजपूत, प्रविण पाटील, आनंद पाटील, नितीन चव्हाण, शेख लतीफ, सोनु मनियार, भगतसिंग पाटील,मयुर खेवलकर, सुमेध गुरचळ, विजेंद्र पाटील, आनंद इंगळे, नितीन बोरोले, शांताराम गंगतीरे, निना पाटील, बाळु पाटील, नागरीक यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.