भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दिपनगर प्रकल्पाच्या कोट्यावधी मालमत्तेचे डोळयात तेल घालून, जिवाची पर्वा न करता सुरक्षा रक्षक संरक्षण करीत असतांना महानिर्मितीमध्ये कार्यरत मेस्को कंपनी गेल्या अनेक वर्षापासुन महानिर्मितीत येत असलेल्या भत्त्यावर ताव मरीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी ट्रेड युनियन काँग्रेसने ९ मे रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी युनियनने विविध विषयावर चर्चा करत सांगितले की, हा सर्व प्रकार उघड असतांना दीपनगर व्यवस्थापन कोणतीही कार्यवाही करीत नसल्याने सुरक्षा रक्षकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्मिण झाले आहे. याबाबत २१ मार्च २०२४ रोजी दिपनगर वीज व्यवस्थापनाला तातडीने भत्ते देण्याबाबत राष्ट्रवादी ट्रेड युनियनने पत्र दिले होते .परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही. विशेष म्हणजे ६६० मेगावेँट प्रकल्पात नविन कार्यरत एम.एस.एफ. या सुरक्षा कंपनीला पुर्णताः भत्ते देण्यात येत असून सदर दोघांतील तफावत दाखवणारी पे स्लीपची प्रत पत्रकारांना देण्यात आली, असे असतांना व्यवस्थापन कारवाही का करीत नाहीत असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वास्तवितक महानिर्मितीच्याच परीपत्रकाप्रमाणे करण्यात येणाऱ्या कंपनी, कंत्राटदार यांच्यावर कडक कार्यवाही करण्याची स्पष्ट निर्देश असून याकडे अधिकारी हेतुपुरस्पर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. सदर कामगाराचे प्रश्न सोडविण्यासाठी महानिर्मिती कल्याण विभाग कार्यरत असून ते सुद्धा याबाबत चर्चा किंवा पुढाकार घेत नसल्याने यांच्यावर कोणा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव असल्यामुळे हे सुरक्षा रक्षकांना न्याय देवू शकत नाहीत असा आरोप राष्ट्रवादी ट्रेड युनियन काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. ९ मार्च २०२४ रोजी विज केंद्रात कोळसा हाताळणी विभागात मोठ्या प्रमाणात आग लागली होती. त्यावेळी फायरफायटींग विभागातील फायर सिलेंडर ऑपरेट झाले नसून हि बाब अत्यंत गंभीर असल्याचे व्यवस्थापनाच्या निर्देशनास आणून दिल्यावरही कोणतीही कार्यवाही झाली नाही. मुख्यतः फायर सिलेंडर मेन्टनन्सचा कंत्राट गेल्या ६ महिन्यापासुन बंद असल्याने अनेक वर्षापासुन पडलेले फायर सिलेंडर योग्य पध्दतीने दुरूस्त केले जात नसल्यामुळे ही परिस्थिती झाल्याची चर्चा होती. सदर ठेका बंद असल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
मुख्य अभियंता पंकज सपाटे साहेब असतांना कार्यरत कंत्राटी कामगार आजारी अथवा त्या अनुषगांने त्याची काम करण्याची क्षमता नसल्यास व कामगाराने त्यांच्या पाल्याला त्यांच्या जागी नोकरी देण्याची विंनती केल्यास काम देवू असा स्पष्ट लेखी करार केला होता. त्यानुसार अनेक ठेकेदारांनी त्यांची अंमलबजावणी केली .मात्र काही कामगारांनी या वेळी तसा अर्ज केल्यावरही त्यांच्या पाल्यांना कामावर घेत नसल्यामुळे या सर्व अन्याया विरूध्द व्यवस्थापनाचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी व्यवस्थापनाला आंदोलनाची नोटीस देण्यात आली असून यावर कुठलीही कार्यवाही न झाल्यास दि.२१ मे रोजी सुरक्षारक्षक एक दिवसाचा लाक्षनिक संप करणार आहेत. प्रसंगी आंदोलना दरम्यान अनुचित प्रकार घडल्यास किंवा महानिर्मितीच्या मालमत्तेच्या संरक्षणाची संपूर्ण जाबाबदारी व्यवस्थापनावर राहील. यावेळी राष्ट्रवादी ट्रेड युनियन काँग्रेसचे अरुण दामोदर, कामगार नेते जे. एस वराडे, भरत पाटील, नरेश वाघ, राकेश यादव, विकास पारधे, कोलते व कृष्णा बऱ्हाटे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
सुरक्षा रक्षकांसाठी राष्ट्रवादी ट्रेड युनियन काँग्रेसने दिला आंदोलनाचा इशारा
8 months ago
No Comments