राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचारमंथन-मार्गदर्शन मेळावा संपन्न

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर व जळगाव लोकसभा मतदार संघ पदाधिकारी विचारमंथन तथा मार्गदर्शन मेळावा वेळी प्रतिपादन जळगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर भवनात झालेल्या रावेर व जळगाव लोकसभा मतदार संघ पदाधिकारी विचारमंथन तथा मार्गदर्शन भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक व राज्याचे आपत्ती व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. कार्यकर्ते तथा पदाधिकारी यांच्या भावना समजून घेतल्या, सहकारी पक्षाला नक्कीच साथ दिली जाईल. परंतु त्या त्या क्षेत्रातील राष्ट्रवादी च्या पदाधिकारी याना योग्य तो सन्मान द्यावाच लागेलं. असे यावेळी बोलताना ना अनिल भाईदास पाटील यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी संघटना मजबूत करून बूथ रचना ही नियोजनबद्ध असण्यासाठी मार्गदर्शन केले. माजी आमदार दिलीप वाघ यांनी कार्यकर्ता भूमिका आणि कर्तव्य यावर प्रकाशझोत टाकला. व्यासपिठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकत दिवसेंदिवस वाढत असून येणाऱ्या विधानसभा साठी जिल्यातील जास्तीतजास्त जागा या राष्ट्रवादी काँग्रेसने लढविल्या पाहिजे असे ठाम मत डॉ संभाजीराजे पाटील यांनी आपल्या मनोगतात मांडले। या मेळाव्यात पारोळा एरंडोल मतदार संघातून शेकडो कार्यकर्ते तथा पदाधिकारी उपस्थित होते, तसेच अनेक कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेश घेतला.

 

Protected Content