Home क्राईम राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची निर्घृण हत्या

राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची निर्घृण हत्या


बीड (वृत्तसंस्था) परळी येथील उड्डाणपुलाखाली राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. पांडुरंग गायकवाड असे नगरसेवकाचे नाव असून पहाटेच्या सुमारास काही अज्ञातांनी गायकवाड यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. गायकवाड यांची पत्नी राष्ट्रवादीची नगरसेविका आहे. या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान,या हल्ल्यानंतर मारेकरी फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

परळी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांची पहाटेच्या सुमारास परळीतील उड्डाणलाखाली हत्या करण्यात आली. अज्ञातांनी त्यांच्या चेहऱ्यावर तलवारीने वार केले. या हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र अंतर्गत वादातून ही हत्या करण्यात आली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पांडुरंग गायकवाड यांच्या पत्नी मीनाबाई गायकवाड या राष्ट्रवादीच्या नगरसेविका आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound