Home Cities यावल राष्ट्रीय छात्र सेनेमुळे जीवनाला योग्य दिशा मिळते : प्रा.डॉ.अनिल भंगाळे

राष्ट्रीय छात्र सेनेमुळे जीवनाला योग्य दिशा मिळते : प्रा.डॉ.अनिल भंगाळे

b4a644c2 9bf6 4004 ab85 674e27aa0620
b4a644c2 9bf6 4004 ab85 674e27aa0620

b4a644c2 9bf6 4004 ab85 674e27aa0620
 

फैजपूर (प्रतिनिधी) आयुष्यात यशाला गवसणी घालण्यासाठी शिस्त अतिशय महत्वाची असते आणि शिस्त आणि श्रम, प्रतिष्ठा एनसीसीमुळे लाभते. माझ्या महाविद्यालयात एनसीसीचे वार्षिक प्रशिक्षण शिबीर संपन्न होत आहे, याचा अत्यंत आनंद असून शिबिरात सहभागी प्रत्येकाने येथील उज्जव इतिहास सोबत घेऊन जावा, असे मत महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा डॉ अनिल भंगाळे यांनी केले.

 

तापी परीसर विद्या मंडळ संचालित धनाजी नाना महाविद्यालयात १८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगावच्या वतीने दहा दिवशीय वार्षिक प्रशिक्षण शिबीर दिनांक ४ जून ते १३ जून २०१९ दरम्यान आयोजित करण्यात येत आहे. या शिबिराचा उद्घाटन सोहळा उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. आय. भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी १८ महाराष्ट्र बटालियनचे समादेशक अधिकारी तसेच कॅम्प कामंडन्ट कर्नल सत्यशील बाबर, प्रशासकीय अधिकारी मेजर सुशील कुमार,डॉ उमेश चौधरी, ए.एन.ओ साहेब, सुभेदार मेजर अनिल कुमार, जे.सी.ओ, एन.सी.ओ अधिकारी जळगाव जिल्ह्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील जेडी आणि एसडी कडेट्सचे ४०० कॅडेटस् उपस्थित होते.

उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक कर्नल बाबर यांनी केले. त्यांनी शिबिरासाठी महाविद्यालय प्रशासनाने सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. यासोबत पुढील दहा दिवसाच्या प्रशिक्षणाचा सदुउपयोग करून आयुष्यात मोठी उंची गाठण्यासाठी प्रेरित केले. कर्नल बाबर यांनी कडेट्स यांनी काय करावे आणि काय करू नये याचे मार्गदर्शन केले. यावेळी डॉ उमेश चौधरी यांनी प्रशिक्षणादरम्यान उन्हापासून स्वतःचा बचाव कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले. या शिबिरात ओबीस्टिकल कोर्स सोबतच फायरिंग, बॅटल फिल्ड बॅटल क्राफ्ट, जॅगिंग डिस्टन्स, मॅप रिडींग आणि मिलिटरी विषयांवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

 

शिबिरासाठी नाहटा महाविद्यालयाचे एन सी सी अधिकारी प्रा लेफ्टनंट दीपक पाटील, मुक्ताईनगर येथील प्रा लेफ्टनंट व्ही एम लोंढे, बेंडाळे महाविद्यालयातील प्रा लेफ्टनंट नंदा बेंडाळे, भुसावळ येथील फर्स्ट ऑफिसर आर बी इंगळे, खिरोदा येथील चीफ ऑफिसर व्ही एल विचवे आदी अधिकारी कडेट्स ना विविध विषयाचे प्रशिक्षण देणार आहेत. यासोबत पी आय स्टाफ प्रशिक्षित करणार आहेत.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी तापी परिसर मंडळाचे अध्यक्ष तथा रावेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मा शिरिषदादा चौधरी, उपाध्यक्ष मा प्रा डॉ एस के चौधरी, चेअरमन मा श्री लिलाधर विश्वनाथ चौधरी, आणि सन्माननीय पदाधिकारी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ पी आर चौधरी, सर्व उपप्राचार्य सन्मा. प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, कैलास चौधरी, श्री काळे बाबूजी, गौरव निमजे,युवराज गाढे, नितिन सपकाळे, शेखर महाजन, चेतन इंगळे, प्रकाश भिरुड, नारायण जोगी, सुधाकर सपकाळे,देविदास महाजन एन सी सी कडेट्स आदींचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound