सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नॉट मी बट यु या तत्त्वनिहाय स्वतःच्या आयुष्याला सकारात्मक दिशा देऊन समाज उत्थानात भरीव योगदान देण्याच्या उदात्त हेतूने राष्ट्रीय सेवा योजना कार्य करीत आहे. महाविद्यालयातील श्रमदान, विविध बौद्धिक सत्रे, सामाजिक उपक्रम यांच्यासहित सात दिवसीय विशेष हिवाळी संस्कार शिबिर जीवनाला दिशादर्शक व समृद्ध करणारे आहे असे मनोगत तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी व्यक्त केले. ते मोहमांडली येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा येथे आयोजित सात दिवसीय विशेष हिवाळी संस्कार शिबिरात बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ सतीश पाटील, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ विकास वाघुळदे, महिला सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ. पल्लवी भंगाळे, प्रा विवेक महाजन यांच्यासहित स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिनांक २ जानेवारीपासून मोहमांडलीच्या आदिवासी भागात महाविद्यालयातील विशेष हिवाळी संस्कार शिबिर युथ फॉर माय इंडिया व युथ फॉर डिजिटल लिटरसी या थीमवर आयोजित करण्यात आले आहे. यात सकाळी पाच वाजेपासून शारीरिक व्यायाम, योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा यांच्यासोबत परिसर स्वच्छता, विविध सामाजिक उपक्रम, विविध विषयांवरील बौद्धिक सत्रे, खेळ व उपजत कलागुणांचा आविष्कार असा दिनक्रम असून आयुष्यभर संस्मरणीय राहील असा अनुभव स्वयंसेवकांना लाभत आहे.
बौद्धिक क्षेत्रात डिजिटल इंडिया चे भविष्य या विषयावर कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी दृकश्राव्य सादरीकरण त्यांत त्यांनी सांगीतले की, एक जुलै 2015 पासून डिजिटल इंडिया लॉन्च होऊन गेल्या पंधरा वर्षात अवघ्या विश्वातील 40% डिजिटल ट्रांजेक्शन फक्त भारतात होतात. प्रत्येक भारतवासीयाला मिनिमम गव्हर्मेंट मॅक्झिमम गव्हर्नन्स या तत्त्वनिहाय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, प्रत्येकाचा मोबाईल इंटरनेट सुविधेने सुसज्ज असून बँकेच्या विविध सुविधा उपलब्ध व्हाव्यात, भारत नेट आधार कार्ड या माध्यमातून सामान्यातील अति सामान्यांचे जनजीवन सुखकारक व्हावे ही या दृष्टीने डिजिटल इंडिया कार्य करत असून सद्यस्थितीत दुर्गम अति दुर्गम भागापर्यंत इंटरनेटचे जाळे पसरले आहे भारत आयात करणारा नाही तर निर्यात करणारा देश बनला आहे वही घोडदौड अशीच पुढे सुरू राहावी यासाठी एनएसएस स्वयंसेवकांनी त्यांची योगदान द्यावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनएसएस स्वयंसेवकांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी व स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.