Home क्रीडा राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा : महाराष्ट्र राज्य संघाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी जळगावच्या तीन खेळाडूंची...

राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा : महाराष्ट्र राज्य संघाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी जळगावच्या तीन खेळाडूंची निवड

1bf607b7 eb2e 4ee8 b791 7a5cb65d52fa
1bf607b7 eb2e 4ee8 b791 7a5cb65d52fa

1bf607b7 eb2e 4ee8 b791 7a5cb65d52fa
 

जळगाव (प्रतिनिधी) ७ ते २३ जून कटक ओडिशा येथे होणाऱ्या सब ज्युनियर गर्ल्स राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ अंतिम निवडसाठी १५ मे पासून कूपरेज फुटबॉल ग्राउंड मुंबई येथे राज्यातून निवडलेल्या ४० खेळाडूंमधून अंतिम वीस खेळाडूंचा संघ घोषित करण्यात येणार आहे. त्यानुसार प्राथमिक निवड यादीमध्ये जळगावच्या ताप्ती पब्लिक स्कूलच्या कृष्णा बुला ,शितल सहानी व वैष्णवी कोष्टी यांचा समावेश असून त्यासंबंधीचे पत्र नुकतेच त्यांना प्राप्त झाले आहे.

 

या तिघी खेळाडूंना आज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे निरोप देण्यात आला. जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव फारुक शेख यांनी त्यांना क्रीडा साहित्य देऊन गौरव केला. निवड झालेल्या खेळाडूंपैकी कुमारी वैष्णवी, कोष्टी पूर्वीच मुंबई येथे निघून गेलेली आहे. आज या तिघी खेळाडूंना जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. ताप्ती स्कूल च्या प्राचार्य लीना कटलर, क्रीडा शिक्षिका संध्या बनसोड,असोचे इम्तियाज शेख,नित्यानंद पाटील,प्रो डॉ अनिता कोल्हे,ताहेर शेख आदींनी अभिनंदन केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound