पाचोरा प्रतिनिधी । येथील तहसिल कार्यालयात आज (दि. २४ डिसेंबर) रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पाचोरा ग्राहक संघाचे अध्यक्ष प्रा. डी. एफ. पाटील हे होते. तर प्रमुख उपस्थितांमध्ये तहसिलदार कैलास चावडे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष चिंधु मोकळ, उपाध्यक्ष संजय पाटील, संघटक शरद गिते, सह संघटक प्रशांत सांगळे, सह सचिव अरुणा उदावंत, कोषाध्यक्ष डॉ. कुणाल पाटील, अन्न व औषध समिती प्रमुख गिरीश दुसाने, महाराष्ट्र ग्राहक पंचायत संघटनेचे जिल्हा सह संघटक राजेंद्र शिंपी, तालुका संघटक वैशाली बोरकर, न. पा. उपमुख्याधिकारी डी. एस. मराठे, दक्षता समिती सदस्या शाकीराबी पिंजारी, पुष्पांजली तांबे, शाकीर बागवान, महावितरण कंपनीचे रामचंद्र चव्हाण, रविंद्र शिरसाठ, पुरवाठा निरीक्षक अधिकारी पुनम थोरात, अभिजीत येवले, अव्वल कारकून उमेश पुरी, उमेश शिर्के, शिव पाटील उपस्थित होते. ग्राहक दिनानिमित्त तहसिलदार कैलास चावडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डी. एफ. पाटील, संघटक शरद गिते, अरुणा उदावंत यांनी ग्राहकांच्या हिताच्या व हक्कांबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.