नाहाटा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय परिषद’ उत्साहात

nahata clg

 

भुसावळ प्रतिनिधी । येथील कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागातर्फे एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे नुकतेचे आयोजन करण्यात आले होते. अश्या प्रकारची परिषद शहरात पाचव्यांदा आयोजित करण्यात आली होती.

या परिषदेचे उद्घाटन प्रा.डॉ.बी.व्ही.पवार (प्रभारी रजिस्ट्रार, कबचौ उमवि जळगाव) यांनी केले असून अध्यक्षस्थानी डॉ. मोहन फालक (अध्यक्ष, ताप्ती एज्युकेशन सोसायटी भुसावळ) हे होते. या परिषदेत सुमारे १३० ते १४० संशोधक प्राध्यापक तसेच संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यात संगणक व माहिती तंत्रज्ञानातील नवीन विचार प्रवाह या विषयावर सखोल असे विवेचन उपस्थित संशोधकांनी केले. तसेच ६० संशोधकांनी आपल्या शोधनिबंधांचे वाचन केले. ही परिषद एकूण चार सत्रात संपन्न झाली.

परिषदेचे सत्र
प्रथम सत्रात प्रा. डॉ. चंद्रशेखर पाटील यांचे बीजभाषण सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत झाले. बीजभाषणात प्रा. डॉ. चंद्रशेखर पाटील हे डिजिटल इमेज प्रोसेससिंग अँप्लिकेशन व रिसर्च या विषयावर सविस्तर व अभ्यासपूर्ण असे मार्गदर्शन केले.
द्वितीय सत्रात संजय झोपे ( San Jose, USA) यांचे बीजभाषण सकाळी ११.३० ते १२.३० या वेळेत झाले. बीजभाषणात संजय झोपे हे डाटा अनालिसिस या विषयावर पॉवरपॉइन्टच्या साहाय्याने मार्गदर्शन केले. तिसरे सत्र १.०० ते ४.०० या वेळेत संपन्न झाले असून याची दोन भागात विभागणी केली होती. A-३६ V Lab यात संशोधक शोधनिबंधांचे वाचन केले.

चौथे व परिषदेचे समारोपाचे शेवटचे सत्र दुपारी ४.३० ते ५.०० या वेळेत संपन्न झाले. त्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मिनाक्षी वायकोळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व अध्यक्षस्थानी परिषदेचे संयोजक उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एच.बऱ्हाटे उपस्थित होते. मान्यवरांनी सहभागी प्राध्यापक, संशोधक विदयार्थी यांना प्रमाणपत्र वाटप केले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी महेश फालक (चेअरमन, ताप्ती एज्युकेशन सोसायटी भुसावळ), विष्णु चौधरी (सचिव, ताप्ती एज्युकेशन सोसायटी भुसावळ), संजयकुमार नाहाटा (कोषाध्यक्ष, ताप्ती एज्युकेशन सोसायटी भुसावळ), प्राचार्य डॉ. मिनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ.एन.ई.भंगाळे, कबचौ उमवि सिनेट सदस्य प्रा.ई.जी.नेहेते तसेच व्याख्याता डॉ. चंद्रशेखर पाटील (विभागप्रमुख स्कूल ऑफ कॉम्पुटर सायन्स MIT वर्ल्ड पीस विद्यापीठ, पुणे) व संजय झोपे (विभागप्रमुख डाटा इंजिनीरिंग अँड अनालिसिस (U.S.A), परिषदेचे संयोजक उपप्राचार्य व संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.बी.एच.बऱ्हाटे व परिषदेचे सचिव प्रा. हर्षल वि. पाटील यांची उपस्थिती लाभली.

यांनी केले परिश्रम
या संपूर्ण परिषदेचे संयोजक उपप्राचार्य व संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.बी.एच.बऱ्हाटे, परिषदेचे सचिव प्रा.हर्षल वि. पाटील तर परिषदेचे विदयार्थी सचिव कु.अपूर्वा बी.बऱ्हाटे, कु.मेघा चौधरी तसेच प्रा.डॉ.जी.आर.वाणी, प्रा.डॉ.गौरी पाटील, प्रा.स्वाती फालक, प्रा.पुनम महाजन, आशिष वि.चौधरी, प्रा.प्रशांत पाटील, प्रा.जयंत बेंडाळे, प्रा.तुषार पाटील, प्रा.डॉ.उमेश फेगडे, प्रा.सचिन कोलते, प्रा.अर्चना भालेराव, प्रा.वैशाली वाय पाटील, प्रा.स्वप्नाली वाघुळदे, प्रा.वैशाली पाटील, प्रा.संजीवनी वाघ, प्रा.लुब्धा बेंडाळे, प्रा.भाग्यश्री पाटील, प्रा. खुशबू भोळे, प्रा.रिया अग्रवाल, तसेच चुडामण कोले, सहदेव तायडे, किशोर नारखेडे, मनीष दलाल, नितीन जोशी, विलास जावळे यांनी अथक परिश्रम घेऊन परिषद यशस्वीरीत्या पार पडली.

Protected Content