रावेर प्रतिनिधी । येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या बैठकीत संघटनेची रावेर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
बैठकीत सर्वप्रथम संत सेवालाल महाराज यांचे प्रतिमा पूजन कऱण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम जाधव, राष्ट्रीय प्रवक्ता अॅड. अविनाश जाधव, जिल्हाध्यक्ष अनिल नाईक, जळगाव शहरप्रमुख दयाराम तवर, अशोक पवार, गणेश पवार, पुनमचंद जाधव, पंडित गुरुजी यांची उपस्थिती होती.
या बैठकीत राष्ट्रीय बंजारा टायगर्सची तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात तालुका सचिव प्रकाश अमान राठोड, उपाध्यक्ष मगन पवार, प्रसिद्धी प्रमुख किशोर चव्हाण, संघटक प्रकाश सरदार राठोड,उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण लालमाती, सहसचिव संजय राठोड गुलाबवडी, जिंसी अभोडा,जुनोदा,गटप्रमुख,उत्तम पवार,पाल लालमाती कुसुम्बा लोहारा गटप्रमुख,मोहन पवार, विद्यार्थी परिषद रावेर साठी विशाल पवार,प्रवीण चव्हाण यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. सर्व पदाधिकार्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना आत्माराम जाधव यांनी समाजाची शैक्षणिक क्षेत्रात पाहिजे तशी प्रगती झालेली नाही यासाठी संघटित झाल्याशिवाय पर्याय नाही तरच आपला अधिकार आपल्याला मिळणार असल्याचे मत व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष अनिल नाईक समाजाची तालुक्यात संघटच्या माध्यमातून लोकांचे सामाजिक शैक्षणिक जे काही अडचण असेल ते सोडवा असे आवाहन केले. याप्रसंगी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनील पवार यांनी केले तर आभार सुरेश तालुका अध्यक्ष यांनी मानले.