बुलढाणा प्रतिनिधी । तालुक्यातील शेगाव येथे राष्ट्रीय आट्यापाट्या फेडरेशनतर्फे राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धचे आयोजन करण्यात होते. फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. डी.व्ही. पाटील, महाराष्ट्र महासचिव डॉ. दिपक कविश्वर, डॉ. अमरकांत चकोले, पुनम कुमार, वसिमराजा, जय कविश्वर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले. उद्घाटनाचा सामना बिहार आणि छत्तीसगड पुरुषांमध्ये रंगला. स्पर्धेसाठी एकूण २० राज्यांतील महिला-पुरुषांच्या ४० संघांनी सहभाग घेतला होता.
राष्ट्रीय आट्यापाट्या फेडरेशनच्या वतीने शेगावमध्ये शुक्रवारी राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धचे उद्घाटन झाले. या स्पर्धेत २० राज्यातून महिला आणि पुरुष संघ दाखल झाले होते. 3 दिवस शहरात रात्रीच्या वेळेस आट्या-पाट्या स्पर्धेचा थरार रंगला होता. उद्घाटनाचा सामना बिहार आणि छत्तीसगड पुरुष मधे रंगला. स्पर्धेसाठी एकूण २० राज्यांतील महिला-पुरुषांच्या ४० संघांनी सहभाग घेतला होता. हे संघ 6 विभागात विभागले आहेत. एका विभागात 6 संघ आहेत. त्यांच्या लिग नॉक आउट मॅचेस झाली. एकूण ६० मॅचेस पार पडले. १३ ते १५ डिसेंबर पर्यंत ही स्पर्धा रंगत दार झाली. स्व. गजाननदादा पाटील मार्कट यार्ड याठिकाणी या मॅचेसपार पडल्या.
राष्ट्रीय स्तरावरील मॅचेसमध्ये महाराष्ट्राच्या संघात जिल्ह्यातील जगदिप बनकर आणि श्वेता देशमुख या 2 खेळाडूंची निवड झाली होती. राज्यस्तरीय मॅचेस आणि निवड चाचणी उस्मानाबाद येथे झाली होती. या राज्यांचा स्पर्धेत सहभाग -महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगढ, झारखंड, मणिपूर, बिहार, तेलंगाणा, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, हिमाचल प्रदेश, दिल्ली, पॉन्डेचेरी, चंदिगड, मध्यप्रदेश, राजस्थान, जम्मू-काश्मिर, गोवा, केरळ, उत्तरप्रदेश, हरियाणा, ओडिशा, गुजरात, तामिळनाडू, दादरा एन एच.
सरकारी नोकरीत आरक्षण मिळावे – डॉ. कविश्वरमहाराष्ट्र राज्य शासनाच्या नोकरी मधे २०१६ पर्यंत आट्यापाट्या खेळाच्या राष्ट्रीय स्तरावरील खेळाडुला ५ टक्के आरक्षण होते. मात्र, नंतर हे आरक्षण काढून टाकण्यात आले. जर कबड्डी, बुद्धीबळ खो-खो इत्यादी खेळांना हे आरक्षण मिळते तर मैदानी पुरातन आट्यापाट्या खेळाला सरकारी नोकरीत आरक्षण का नाही? असा सवाल फेडरेशनचे राज्यस्थरीय महासचिव डॉ. दिपक कविश्वर यांनी यावेळी केला. तसेच ते आरक्षण मिळावे यासाठी फेडरेशन सतत प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.