अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रगीत संबधीचे आदेश व भारतीय ध्वजसंहितान्वये राष्ट्रगीत सुरु असतांना उपस्थित सर्वांनी स्तब्ध उभे राहणे अपेक्षित असते. परंतु शहरातील एका शासकीय कार्यालातील ध्वजारोहन कार्यक्रमाचे कुणीतरी अज्ञात व्यक्तीने चित्रीकरण करत सोशल मिडीयावर टाकल्याप्रकरणी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी लेखी तक्रार दिली आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी ध्वजारोहण प्रसंगी राष्ट्रगीत सुरु असतांनाचे चित्रीकरण हॉट्सअॅपवर प्रसिद्ध केल्यामुळे राष्ट्रगीताचा अवमान झाल्याचे माजी आमदार साहेबराव पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
माजी आमदार साहेबराव पाटील यांनी अमळनेर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आपल्या कार्यालयासमोरील पटांगणात १ मे, २०१९ महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणप्रसंगी राष्ट्रगीत सुरु असतांनाचा एक व्हीडीओ ‘अमळनेर परिसर न्यूज’ या हॉट्सअॅपवर टाकण्यात आला. गृपमधील भ्रमणध्वनी क्रमांक ८३७९९२२८८८ द्वारा फोटोंसह ध्वजारोहणाचे फोटो सार्वजनिकरित्या सोशल मिडीयावर दिनांक १ मे २०१९ रोजी दुपारी १५.१६ मिनिटांत प्रसिद्ध झालेली आहे. वास्तविक बघता ध्वजारोहण प्रसंगी राष्ट्रगीत सुरु असतांनाचे कोणीही चित्रीकरण करणे अभिप्रेत नसते. सदर घटना राष्ट्रीय सन्मानाच्या प्रतिष्ठेस प्रतिबंध अधिनियम १९९१, अधिनियम क्रमांक ६९ अन्वये 522 भारताच्या राष्ट्रगीत संबधीचे आदेश व भारतीय ध्वजसंहितान्वये स्तब्ध उभे न राहता चित्रीकरण करुन हॉट्सअॅपद्वारा प्रसिद्ध करणे हा गुन्हा आहे.
महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण प्रसंगी राष्ट्रगीत सुरु असतांनाचे चित्रिकरण करुन शोशल मिडीयाद्वारे (व्हॉट्सअॅपद्वारे) माहिती प्रसिद्ध करणाऱ्यांची चौकशी करुन राष्ट्रीय सन्मानाच्या प्रतिष्ठेस प्रतिबंध अधीनियम १९७१, अधिनीयम ६९ अन्वये कार्यवाही करण्यात यावी,अशी विनंती माजी आमदार श्री.पाटील यांनी केली आहे. दरम्यान, या तक्रारीच्या पार्टी विभागीय आयुक्त, नाशिक, जळगाव जिल्हाधिकारी, जळगाव पोलीस अधिक्षक, अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी,अमळनेर तहसिलदार, अमळनेर पोलीस निरीक्षक यांना रवाना करण्यात अली आहेत.