पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | संभाजीनगर (औरंगाबाद) येथे नुकतीच पार पडलेली “प्रोऍक्टिव्ह अबॅकस नॅशनल समर कॉम्पिटिशन (नॉर्थ झोन) २०२२” या स्पर्धेमध्ये पाचोरा येथील वेदीकस अबॅकसचे ४ विद्यार्थी राज्यातून ट्रॉफी विनर ठरले.
६ मिनिटांत १०० गणिते सोडविणे असे स्पर्धेचे स्वरूप होते. या स्पर्धेत राज्यातून राधिका परदेशी (क्रमांक- तिसरा), तनुश्री चौधरी (क्रमांक- तिसरा), कीर्ती पाटील (क्रमांक- पाचवा), कृष्णा पुजारी (क्रमांक – पाचवा) हे विद्यार्थी विजेतेपदाचे मानकरी ठरले.
तसेच सहभागी स्पर्धकांना आकर्षक ट्रॉफी देण्यात आली. सदर स्पर्धेत नाशिक, अहमदनगर, जालना, संभाजीनगर, बीड, नांदेड, उस्मानाबाद, जळगाव, ठाणे, धुळे, नंदुरबार, उस्मानाबाद, लातूर, बुलढाणा, हिंगोली, मधील १२५० स्पर्धकांनी भाग घेतला होता.
सदर कार्यक्रमास राजेंद्र लोचानी, स्नेहा लोचानी, अजय मणियार, गिरीष करडे, सारिका करडे, तेजस्विनी सावंत डायरेक्टर प्रोऍक्टिव्ह अबॅकस मुंबई हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना पाचोरा येथील वेदीकस अबॅकसचे संचालक रविंद्र पाटील व सपना शिंदे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.