Home धर्म-समाज श्रीक्षेत्र कुरंगी ते पैठण पाय दिंडी सोहळा व नाथ महाराजांचे पादुकाचे पुजन

श्रीक्षेत्र कुरंगी ते पैठण पाय दिंडी सोहळा व नाथ महाराजांचे पादुकाचे पुजन


pachora 1

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील कुरंगी येथे नगराध्यक्ष संजय गोहिल व पत्नी उर्वशी गोहिल यांच्याहस्ते श्रीक्षेत्र कुरंगी ते पैठण पाय दिंडी सोहळ्याचे नाथ महाराजांचे पादुकाचे पुजन करण्यात आले. यावेळी पाचोरा-भडगाव तालुक्याचे आमदार किशोर पाटील यांची उपस्थिती होती. नाथषष्ठी निमित्ताने श्री संत एकनाथ महाराज जल समाधी सोहळा कुरंगी ते पैठण पायी दिंडी सोहळा (वर्ष 22 वे) चे आयोजन ह.भ.प कैलासजी महाराज कुरंगीकर हे करीत असतात.

या कार्यक्रमाला आमदार किशोर पाटील यांच्याहस्ते नाथ महाराजांची पालखीचे पुजन व आरती करण्यात आली. दरवर्षी आमदार किशोर आप्पा हे सक्तीने या दिंडी सोहळ्याला उपस्थिती देतात व अग्रस्थानी असतात. यावेळी वारकरी भावीकांना संबोधतांना आप्पासाहेब बोलले, ‘हि अखंड परंपरा अशीच सुरू राहिल व भक्ती व परमार्थ शिवाय मुक्ती नाही म्हणुन हे पायी दिंडी चालण्याचे भाग्य काही क्वचित लोकांनाच मिळते त्यांच्यातले आपण सर्व आहात व आपली वारी सुखरूप व आनंदमयी व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्यात.

दिंडी सोहळ्यात यांची होती उपस्थिती
शिवसेनेचे जि.प सदस्य पदमसिंग पाटील, माजी जि.प सदस्य राजु पाटील, युवासेनेचे उपजिल्हा युवाधिकारी अजयकुमार जैस्वाल, उपतालुकाप्रमुख विनोद पाटील, गणप्रमुख सुनिल पाटील, नांद्रा सरपंच शिवाजी तावडे, माजी सरपंच बापु सुर्यवंशी, कुरंगीचे सरपंच दिपक मोरे, माजी सरपंच गजानन पवार, पंढरीनाथ पाटील, रामचंद्र धनगर, रत्नराज पाटील, गणेश सर, उपसरपंच मधुकर पाटील, सुदाम तात्या, प्रकाश पाटील, अमिन शेख, शालीक पवार, गोविंद महाराज, आधार पाटील, माधव तात्या, ज्ञानेश्वर पाटील, शाखाप्रमुख डाॅ.शेख डाॅ.सय्यासे, दिनकर पाटील, उमेश चौधरी, भैय्या भोई, पत्रकार नगराज पाटील व नानासाहेब साखरे आणि कुरंगी गावातील ग्रामस्थ व ह.भ.प वारकरी भाविक भक्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन द क्रिएटिव्ह न्यु इंग्लिश स्कुलचे अध्यक्ष यशवंत पवार व आभार पंकज यांनी मानले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound