जळगाव प्रतिनिधी । अवाजवी आणि चुकीच्या वीज बिलांची आकारणी करून नये अशी मागणीचे निवेदन नशिराबाद येथील शेतकऱ्यांसह भाजपा शहर पदाधिकारी यांनी महावितरण कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेवून निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तांत्रिक कारण दाखवत डीपी वर्षभर आहे. यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे चार महिने शेतकऱ्यांना वीज पंप चालविण्याची आवश्यकता भासली नाही. तरीदेखील अव्वाच्यासव्वा वीज बिल पाठवून शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला. यासंदर्भात तोडगा काढून शेतकरी व वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी समन्वय बैठक घेऊन तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारचे षडयंत्र असल्याचा आरोप करण्यात आला. वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहीम तात्काळ थांबवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, भाजप शहराध्यक्ष प्रदीप बोडरे, भाजयुमो अध्यक्ष किरण पाटील, ललित ब-हाटे, डॉ. पंकज इंगळे, जितेंद्र महाजन, सचिन महाजन, ॲड. प्रदीप देशपांडे, प्रशांत पाटील, दिलीप पाटील, विजय सरोदे, चंद्रकांत पाटील, आत्माराम शिरोळे, हेमंत नेहते, खेमचंद नारखेडे, दीपक सोनवणे, प्रवीण पाटील, विठ्ठल पाटील यांच्यासह असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.