Home Cities जामनेर एकदाचे काय असेल ते दाखवूनच टाका ! : गिरीश महाजन यांचे आव्हान

एकदाचे काय असेल ते दाखवूनच टाका ! : गिरीश महाजन यांचे आव्हान

0
31

नाशिक प्रतिनिधी । ”आमच्याकडे हे आहे…आमच्याकडे ते आहे… असे म्हणणार्‍यांनी एकदा काय असेल ते दाखवूनच टाका !” अशा शब्दात माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी विरोधकांना आव्हान दिले आहे.

माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात सध्या आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. आधी अ‍ॅड. विजय भास्कर पाटील आणि नंतर जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी महाजन यांच्या कथित सीडी आणि पेन ड्राईव्ह आपल्याकडे असल्याचे आरोप केले आहेत. या पार्श्‍वभूमिवर आज नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतांना महाजन यांनी विरोधकांना थेट आव्हान दिले आहे.

गिरीश महाजन म्हणाले की, सध्या माझ्या विरूध्द आरोप केले जात असून कुणीही पुरावे देण्यास तयार नाही. मी नेत्यांपासून ते आरोप करणार्‍यांपर्यंत सर्वांना सांगितले आहे की, आपल्याकडे पुरावे असतील ते देऊन टाका. यातच कुणी म्हणतोय आमच्याकडे हे आहे….तर कुणी म्हणतोय ते आहे ! तुमच्याकडे काही असेल तर ते दाखवूनच टाका असे आव्हान गिरीश महाजन यांनी विरोधकांना दिले आहे.


Protected Content

Play sound