फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | फैजपूर येथील ३८ वर्षे अंखडित सेवेत असलेल्या सातपुडा अर्बन क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि. फैजपूर या संस्थेची संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणूकीत नरेंद्र नारखेडे यांच्या नेतृत्वाखाली पॅनलचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले. आज २५ जुलै रोजी नवनिर्वाचीत संचालक मंडळची सभा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. नंदकिशोर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत पुढील पंचवार्षीक कालावधीकरीता चेअरमनपदी नरेंद्र विष्णु नारखेडे यांची तर व्हाईस चेअरमनपदी नितीन नारायण चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्थेचे नवनिर्वाचीत संचालक म्हणून चंद्रशेखर देविदास चौधरी, हेमराज खुशाल चौधरी, डॉ. प्रा. पद्माकर ज्ञानदेव पाटील, गिरीष चोलदास पाटील, पांडुरंग दगडू सराफ, सुनिल लक्ष्मण वाढे, नयना चंद्रशेखर चौधरी, सुनिता किरण चौधरी हे संचालक म्हणून बिनविरोध निवडून आलेले असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नंदकिशोर मोरे यांनी काम पाहिले त्यांना संस्थेचे व्यवस्थापक काशिनाथ वारके यांनी सहकार्य केले. यावेळी सहकार अधिकारी प्रशांत साळवे, किरण चौधरी, किशोर नेहेते, विजयकुमार सावकारे आदि उपस्थित होते.