तिसऱ्यादा पंतप्रधान होताच नरेंद्र मोदींनी घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मोदींनी महत्त्वाचा निर्णय घेतला. तिसऱ्या टर्ममधील पहिलाच निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पीएम शेतकरी सन्मान निधीचा 17 वा हफ्ता जारी केला आहे. यामुळे देशभरातील 9.3 कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल. यादरम्यान पंतप्रधान म्हणाले, शेतकऱ्यांचं कल्याण हे आमचं प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे यापुढेही कृषी क्षेत्रासाठी काम करीत राहू.

यापूर्वी पीएम शेतकरी योजनेअंतर्गत देशातील कोट्यावशी शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्याच्या 28 तारखेला 16 वा हफ्ता बँक खात्यात पाठवण्यात आला होता. केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पीएम शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपयांचं अर्थसहाय्य केलं जातं. मात्र या योजनेअंतर्गत ही रक्कम एकरकमी न देता दोन दोन हजार करीत वर्षातून तीनवेळा बँक खात्यात पाठवली जाते.

तुम्ही शेतकरी पोर्टल https://pmkisan.gov.in/ वर जाऊन आपल्या खात्यात पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा 17 वा हफ्ता आला की नाही हे तपासू शकता. पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेसंबंधित काही अडचणी असल्यास 1800-115-5525 या हेल्पलाइनवर संपर्क करू शकता.

Protected Content