Home राजकीय …आणि पंतप्रधानांनी शरद पवारांना मारला टोला !

…आणि पंतप्रधानांनी शरद पवारांना मारला टोला !

0
35

नवी दिल्ली वृत्तसंस्था । काँग्रेसमध्ये अपमान होऊनही त्या पक्षासोबत राहणार्‍या शरद पवार यांचा आपण सन्मान करतो अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी पवारांना चिमटा काढून टोला मारला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी दिल्ली येथून देशासह राज्यात प्रथम बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकार्‍यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यात बारामती, इंदापूर, दौंड, भोर, पुरंदर-हवेली, खडकवासला या मतदारसंघांतील भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, वरिष्ठ नेते असूनदेखील शरद पवार यांना काँग्रेसने अपमानास्पद वागणूक दिली. मी त्यांचा वैयक्तिकरीत्या सन्मान करतो. पवार यांनी जनतेसाठी काम केले, पवार यांची चूक एवढीच होती की, त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी दावा केला होता. त्यासाठी रातोरात त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविला. हे केवळ घराणेशाही असणार्‍या पक्षात होऊ शकते. मजेदार गोष्ट ही की, तरीही शरद पवार अपमानित केलेल्या काँग्रेसच्या तंबूत आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना चिमटा काढत टोला लगावला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound