पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नारायण राणे यांना आज पोलीसांनी अटक केली. राणे यांना अटक झाल्याप्रकरणी पहूर येथील महाविकास आघाडीतर्फे बसस्थानक परिसरात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी शहर प्रमुख संजय तायडे, माजी शहरप्रमुख सुकलाल बारी, उपसरपंच श्याम भाऊ, शिवसेनेचे गणेश पांढरे, सुभाष पाटील, प्रकाश पाटील, शेतकरी संघटक भावराव गोधनखेडे, युवासेना उपतालुका प्रमुख अमीन शेख, सादिक भाई पठाण, मुजावर पिंजारी, इरफान शेख, शिवसेनेचे गणेश तायडे यांच्यासह शिवसेना युवासेना व महा विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.