धरणगाव (प्रतिनिधी)। तालुक्यातील नांदेड येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळेत सांस्कृतीक कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन धरणगाव पंचायत समितीच्या उपसभापती जनाबाई आसाराम कोळी यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमास गावातील नागरीक, पालक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वितेसाठी यांनी घेतल परीश्रम
शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत सैंदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक रामकृष्ण बाविस्कर, संदीप खैरनार, विमल पाटील, सोनाली अत्तरदे, जितेंद्र पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर व कर्मचारी यांनी यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.