Home Cities भुसावळ जि.प. सदस्या नंदाताई सपकाळे यांच्या संपर्क कार्यालयास प्रारंभ (व्हिडीओ)

जि.प. सदस्या नंदाताई सपकाळे यांच्या संपर्क कार्यालयास प्रारंभ (व्हिडीओ)

0
72

भुसावळ प्रतिनिधी । जिल्हा परिषद सदस्या नंदाताई दिलीप सपकाळे यांच्या संपर्क कार्यालयाचे आज आमदार हरीभाऊ जावळे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.

नंदाताई दिलीप सपकाळे यांनी अंजाळे या गावी आपले संपर्क कार्यालय सुरू केले आहे. आमदार हरीभाऊ जावळे यांनी याचे उदघाटन केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे विधानसभा विस्तारक हर्षल पाटील, जिल्हा सरचिटणीस उज्जैनसिंग राजपूत, सामाजिक कार्यकर्ते दिलीप सपकाळे, अंजाळे येथील सरपंच मनीषा कोळी, ग्रामपंचायत सदस्य प्रमीलाबाई सपकाळे, त्र्यंबक सपकाळे, योगेश साळुंके, शांताराम सपकाळे, सुनील सपकाळे, पंकज सपकाळे, शंकर कोळी, सागर सपकाळे, संजय सपकाळे, विशाल सपकाळे, अमोल सपकाळे, भैया मोरे आदींची उपस्थिती होती.

याप्रसंगी आमदार हरीभाऊ जावळे म्हणाले की, आज अगदी अंजाळे गावाच्या सरपंचापासून ते देशाच्या पंतप्रधानांपर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. या अनुषंगाने गावाच्या विकासासाठी आम्ही भरीव निधी दिला आहे. तसेच जिल्हा परिषद सदस्या नंदाताई सपकाळे यांनी जनतेच्या सेवेसाठी संपर्क कार्यालय सुरू केल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.

पहा:– नंदाताई सपकाळे यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाबाबतचा हा व्हिडीओ.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound