नंदन वळींकार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्यू.कॉलेजचे उपशिक्षक प्रा.नंदन व्ही.वळींकार यांना नुकताच “जळगांव जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार”जाहिर झाला आहे.

 

यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्यू.कॉलेजचे उपशिक्षक तसेच जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, जळगांव(ज्युक्टो)जिल्हाध्यक्ष  प्रा.  नंदन वळींकार(प्रा.एन.व्ही.वळींकार)यांना शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल समता शिक्षक परिषदेच्या वतीने नुकताच शिक्षकांच्या मानाचा “जळगाव जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार” जाहिर करण्यात आला आहे. प्रा. वळींकार यांनी आपल्या शिक्षकी पेशेची सुरुवात दि.१३ जून १९९५ पासून केली. त्यांच्या २७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आपल्या अध्यापनाचा ठसा त्यांनी जनमानसात व विद्यार्थ्यांमध्ये उमटविला. विद्यार्थ्यांना ज्ञानदान करतांना त्यांनी अथक परिश्रम घेतले आहे. त्यांच्या ध्येयवादी व चिकाटीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशात त्यांच्या पत्नी नलिनी नंदन वळींकार यांचा मोलाचा हातखंडा असल्याची भावना प्रा.वळींकार यांनी यावेळी बोलून दाखविली. त्याचबरोबर प्रा. वळींकार हे जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना,जळगांव(ज्युक्टो) या संघटनेत सन २००५ पासून तालुका सचिव,यावल तालुका अध्यक्ष, जिल्हाउपाध्यक्ष,आठ वर्षांपासून जिल्हासचिव व आता जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर यशस्वीपणे सांभाळत आहे.शिक्षकांच्या समस्या सोडविण्यात त्याचा मोठाच हातखंडा आहे.

Protected Content