मुंबई प्रतिनिधी । शिवसेनेचा प्रखर विरोध असणारा नाणार प्रकल्प अखेर रद्द करण्यात आला असून आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर असणार्या राजापूर तालुक्यातील नाणार येथे हा तेलशुद्धीकरण प्रकल्प होणार होता. २०१५ साली या प्रकल्पाची राज्य सरकारने घोषणा केली होती. मात्र शिवसेनेने याला जोरदार विरोध केला होता. शिवसेना-भाजप युतीची घोषणा करण्याकरिता जी पत्रकार परिषद झाली होती, त्यात मुख्यमंत्र्यांनी नाणारबाबतही घोषणा केली होती. नाणार प्रकल्प हा लोकांची मान्यता असेल त्याठिकाणी हलवण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. या अनुषंगाने आज नाणार प्रकल्पासाठी निघालेली भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सुभाष देसाई यांनी जाहीर केली.