नाना पटोलेंचे वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीचा छापा

नागपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | नागपूर येथील वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीने छापा टाकला असल्याचे वृत्त आहे. याआधी सतीश उके यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील याचिकेत सतीश उके यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची बाजू मांडली होती.

 

गुरुवारी सकाळपासूनच उके यांच्या नागुपरातील निवासस्थानी अंमलबजावणी संचलनालयाच्या अधिकाऱ्यांकडून झाडाझडती सुरु आहे. मात्र ही छापेमारी नेमक्या कोणत्या प्रकरणात सुरु आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ॲड. सतीश उके यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बाजूने फोन टॅपिंग प्रकरणात केस लढवली होती.

पार्वती नगर भागातील निवासस्थानी गुरुवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास ईडी अधिकाऱ्यांनी छापा टाकला. सध्या ॲड सतिश उके आणि त्यांचे भाऊ प्रदीप उके घरी आहेत. नागपुरातील एका जमीन व्यवहाराच्या संदर्भात उकेंना क्राईम ब्रांचने नोटीस बजावली होती. या प्रकरणाशी संबंधित ही छापेमारी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उकेंच्या घराबाहेर सीआरपीएफ जवान आणि पोलिसांचा बंदोबस्त पहायला मिळत आह.

Protected Content